Jalgaon Loksabha 2019 : जळगावमध्ये तीनपर्यंत 37.24 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

जळगाव लोकसभा मतदारसंघातील अमळनेर 40.48, चाळीसगाव 43.60, एरंडोल 49, जळगाव शहर 36.84, जळगाव ग्रामीण 46.13, पाचोरा 41.94 या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एवढ्या मतदानाची नोंद झाली आहे. जळगावमधील लढतीकडे भाजपने उमेदवार बदलल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर आणि भाजपचे उन्मेष पाटील यांच्यात थेट लढत असलेल्या जळगावमध्ये दुपारी तीनपर्यंत 37.24 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.  

जळगाव लोकसभा मतदारसंघातील अमळनेर 40.48, चाळीसगाव 43.60, एरंडोल 49, जळगाव शहर 36.84, जळगाव ग्रामीण 46.13, पाचोरा 41.94 या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एवढ्या मतदानाची नोंद झाली आहे. जळगावमधील लढतीकडे भाजपने उमेदवार बदलल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगावमध्ये भाजपने विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपने पुन्हा एकदा वाघ यांना उमेदवारी माघारी घेत उन्मेष पाटील यांना तिकीट दिले. गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीने याठिकाणी जोरदार प्रचार केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gulabrao Devkar and Unmesh Patil contest Jalgaon Loksabha constituency