Loksabha 2019 : विजयापासून एक पाऊल दूर : खा. हेमंत गोडसे

godse
godse

नाशिक (इंदिरानगर) : संपूर्ण लोकसभा निवडणूक कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतली होती. त्याला सर्वसामान्य मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी लावलेली हजेरी बघता ऐतिहासिक विजयापासून एक पाऊल आता आपण मागे आहोत असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी पाथर्डी फाटा येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या मिसळ पार्टीमध्ये व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी झालेली मिसळ पार्टी ही फिक्सर्स ची होती तर आजची ही  कार्यकर्त्यांची आहे असे देखील त्यांनी नमूद केले. बाजार समितीचे अध्यक्ष शिवाजी चुंभळे नगरसेवक सुदाम डेमसे, दिलीप दातीर, सुधाकर बडगुजर भागवत आरोटे, भगवान दोंदे ,माजी नगरसेवक संजय नवले,अमोल जाधव,उत्तम दोंदे ,माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारी,जगन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच सक्रिय असणारे कार्यकर्ते एकत्र आले होते . कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत  कामी येणार असून  केवळ विजय मिरवणुकीच्या औपचारिकता बाकी असल्याचे बडगुजर आणि दातीर यांनी स्पष्ट केले .मात्र  काही बूथ वर मतदार संख्या 1200 च्या पुढे असल्याने एकंदर मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वेळेचा विचार केला तर अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याने निवडणूक आयोगाने एका बूथवर जास्तीत जास्त 700 इतकी मतदार संख्या निश्चित करावी असे त्यांनी नमूद केले. त्या निमित्ताने गाव निहाय, बूथनिहाय पुन्हा एकदा सगळ्या चर्चा झाडल्या जात होत्या.

नाशिक शहरात विशेषता नाशिक पश्चिम मधून मिळणाऱ्या निर्णायक आघाडीबाबत कार्यकर्ते विश्वासाने बोलत होते. नाशिक मध्य आणि नाशिक रोड देवळाली चा काही भाग वगळता सर्वत्र बोलबाला होता असा विश्वास व्यक्त करण्यात आला.  सिन्नरचा ट्रॅक्टर फॅक्टर हा देखील मर्यादेतच राहिला असून त्याचा देखील विशेष फरक पडणार नाही असा विश्वास त्या भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. इगतपुरी तालुक्यातल्या टाकेद आणि खेड ,घोटी आदी भागात देखील निव्वळ चर्चा असून प्रत्येक गावात भरभरून मतदान झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रत्येक कार्यकर्त्यांशी गोडसे यांनी चर्चा केली .गिरणारे येथील शिवसैनिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मिसळ पार्टी महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी असली तरी मित्रपक्षातील सदस्य नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य होती. शिवसेनेचे देखील मोठ्या संख्येने नगरसेवक अनुपस्थित होते.

अक्षय तृतीयेच्या सणामुळे अनेकांनी येऊ शकत नसल्याचे आयोजकांना कळवले होते .यावेळी   शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख गणेश जाधव,पाथर्डी सोसायटीचे अध्यक्ष संजय डेमसे, विभाग प्रमुख त्रंबक कोंबडे,सतेज महाजन ,संजय चूंभळे ,भूषण राणे,राम बडगुजर ,वैभव फेंडर,शिवाजी जाधव,शैलेश कार्ले,निलेश साळुंखे, भगवान वारुंगसे ,एकनाथ नवले ,सदा नवले ,पंडित धात्रक ,गणेश ठाकूर, ऍड अरुण खांडबहाले ,संदेश एकमोडे,पांडुरंग शिरसाठ ,चेतन चूंभळे ,सुनील नवले, पांडुरंग शिरसाठ ,प्रमोद पाटिल ,गौतम दोंदे ,दादा मेढ़े आदींसह नाशिक शहर इगतपुरी नाशिक रोड सिन्नर आदी भागातील शिवसैनिक आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक संजय नवले यांनी स्वागत तर नगरसेवक सुदाम डेमसे आणि भगवान दोंदे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com