Loksabha 2019 : मोदींसारखा भित्रा पंतप्रधान कधी पाहिला नाही : प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मे 2019

- पंतप्रधान मोदींना प्रियांका गांधी यांनी म्हटले भित्रा, कमकुवत.

- खरी राजकीय शक्ती काय आणि कशात असते हेही सांगितले प्रियांका गांधी यांनी.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्यासारखा भित्रा आणि कमकुवत पंतप्रधान आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही पाहिला नाही. राजकीय शक्ती ही मोठ-मोठ्या प्रचारामुळे येत नाही. तर देशातील जनता सर्वांत मोठी आहे, असे जो कोणी मानतो तिच खरी राजकीय शक्ती आहे, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (गुरुवार) सांगितले.

उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे आयोजित जाहीरसभेत प्रियांका गांधी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ''जनता सर्वांत मोठी आहे, असे जे कोणी मानते तिच खरी राजकीय शक्ती असते. जनतेचे प्रश्न ऐकून ते सोडवण्याची शक्ती, असे प्रश्न सोडवित असताना होत असलेली टीका झेलण्याची शक्ती, विरोधकांची विधाने ऐकून घेण्याची शक्ती. मात्र, पंतप्रधान मोदी हे तुमचे म्हणणे तर ऐकत नाहीतच पण जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणेही योग्य समजत नाहीत''. 

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी रोजगार, जीएसटी यांसारख्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी, असे आव्हानही प्रियांका गांधी यांनी यापूर्वी केले होते. त्यानंतर आता त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत हे वक्तव्य केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I never saw a Prime Minister like Narendra Modi says Priyanka Gandhi