Loksabha 2019 : 'मला मायावतींना पंतप्रधानपदी पाहायचंय'

वृत्तसंस्था
Thursday, 9 May 2019

- आमची आघाडी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षासोबत नाही तर राष्ट्रीय लोकदलासोबतही.

लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांना पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे मला पाहायचे आहे, असे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच बसप-सपची आघाडी एका संकल्पावर आधारित असून, कोणत्याही मजबुरीमुळे झाली नाही, असेही ते म्हणाले. 

अखिलेश यादव म्हणाले, आमची आघाडी फक्त समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षासोबत नाही तर राष्ट्रीय लोकदलासोबतही आहे. बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. तर मायावती या मला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनविण्यासाठी मदत करणार आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मायावती यांच्या बसपला नेमक्या किती जागा मिळतील आणि त्या पंतप्रधानपदी विराजमान होतील का, हे लवकरच स्पष्ट होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I want to see Mayawati as the Prime Minister says Akhilesh Yadav