Loksabha 2019 : राज ठाकरेंनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास आनंदच : उर्मिला मातोंडकर

वृत्तसंस्था
रविवार, 14 एप्रिल 2019

- राज ठाकरेंची सभा नको, असे कोणाला वाटेल?

- राज ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल

मुंबई : राज ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल. राज ठाकरेंची सभा नको, असे कोणाला वाटेल?, असा सवाल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी उपस्थित केला. तसेच मातोंडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचे कौतुकही केले.

उर्मिला मातोंडकर यांचा सामना भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी उर्मिला मातोंडकर आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. मातोंडकर म्हणाल्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा कोणाला नकोय? राज ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल.

दरम्यान, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी दंड थोपटले आहे. त्यामुळे विविध ठिकाणी होणाऱ्या प्रचारसभांमध्ये मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I will happy If Raj Thackeray holds a meeting in my constituency says Urmila Matondkar