कारणराजकारण : कसब्यात राजकीय जुगलबंदी; नागरिकांच्या प्रश्नाला बगल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे : राजकीय प्रचार, नेत्यांची सत्तेसाठी चाढाओढ, कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला मात्र बगल दिली जात आहे असे दिसते. कसबा पेठ मतदारसंघातीसल जुन्या वाड्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्नांबाबत 'सकाळ'ने 'कारणराजकारण' या फेसकबुक लाईव्हमध्ये कसब्यातील राजकीय कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

जेव्हा विकासाचा मुद्दा येतो तेव्हा, राजकीय कार्यकर्ते विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून हमरी-तुमरीवर येतात. आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच स्वतःचा मुद्दा रेटण्याचा चित्र पाहण्यास मिळाले. 

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला मनसेने पाठिंबा देत भाजपच्या विरोधात घोषणाबाजी बाजी केली. त्याला भाजप शिवसेनेने जोरदार प्रतिउत्तर दिले. या  संवादात वेगवेगळ्या विषयाचा उहापोह करण्यात आला.

Web Title: Interaction with local and political activists at Kasba