Loksabha 2019 : 'भाजपचा पराभव अटळ; मतांद्वारे लोकं दाखवतील संताप'

वृत्तसंस्था
रविवार, 12 मे 2019

- मोदी सरकारविरोधात जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात संताप आणि आक्रोश.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरोधात देशातील जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात संताप आणि आक्रोश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल हे निश्चित असून, मतांच्या माध्यमातून जनता त्यांचा संताप व्यक्त करेल, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (रविवार) सांगितले. 

दिल्लीतील लोढी इस्टेट येथील सरदार पटेल विद्यालयात प्रियांका गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, 2019 ची लोकसभा निवडणूक लोकशाही आणि देशाला वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे मतदान करताना ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. या निवडणुकीमध्ये देशातील जनतेमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आक्रोश दिसत होता. त्यामुळे भाजपचा पराभव होणार हे आता स्पष्ट झाले आहे. 

जनतेच्या निर्णयावर पुढील निर्णय : राहुल गांधी

सर्व माध्यमांचे आभार मानतो. बेरोजगार, शेतकरी, नोटाबंदी, जीएसटीने अर्थव्यवस्थेचे नुकसान, भ्रष्टाचार या मुद्द्यांवर निवडणूक झाली. या निवडणुकीत मोदींनी द्वेषाचा प्रयोग केला, तर आम्ही प्रेमाचा उपयोग करून निवडणूक लढली. जनता जो निर्णय घेईल, त्यावरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is clear BJP is losing people will express their anger via votes says Priyanka Gandhi