Loksabha 2019 : कन्हैया कुमार लढतोय भाजपच्या दिग्गज नेत्यांशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

'बिहारची औद्योगिक राजधानी' अशी ओळख असलेल्या बेगूसराय मतदारसंघाने गेल्या काही  महिन्यांत अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते गिरिराजसिंह यांच्यासमोर विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने कडवे आव्हान उभे केले आहे.

पाटणा : 'बिहारची औद्योगिक राजधानी' अशी ओळख असलेल्या बेगूसराय मतदारसंघाने गेल्या काही  महिन्यांत अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते गिरिराजसिंह यांच्यासमोर विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने कडवे आव्हान उभे केले आहे.

बिहारमधील सात मतदारसंघांमध्ये आज (सोमवार) मतदान होत आहे. त्यापैकी सर्वाधिक उत्साह बेगूसरायमध्येच दिसून येत आहे. सकाळी दहापर्यंतच्या आकडेवारीनुसार, बेगूसरायमध्ये 13.50 टक्के मतदान झाले होते. 

बेगूसरायमध्ये दोन घटक यंदा कमालीचे प्रभावी ठरतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. हे दोन घटक म्हणजे भूमिहार समाज आणि मुस्लिम समाज! भूमिहार समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार आहे; तर मुस्लिम समाजाने राष्ट्रीय जनता दलाला पाठिंबा दिला आहे. गिरिराजसिंह आणि कन्हैया कुमार हे दोघेही भूमिहार समाजातील आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाने तन्वीर हसन यांना उमेदवारी दिली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kanhaiya Kumar fights with BJP s Giriraj singh