कारणराजकारण : बाणेरकर म्हणतात '...तरच विकास होऊ शकतो'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

कोणतीही एक व्यक्ती विकास करू शकत नाही त्यामुळे स्थानिक नगरसेवक व प्रशासकीय व्यवस्था यांनी एकत्रित काम केले तर विकास होऊ शकतो असे मत बाणेरकरांनी व्यक्त केले.

पुणे : कोणतीही एक व्यक्ती विकास करू शकत नाही त्यामुळे स्थानिक नगरसेवक व प्रशासकीय व्यवस्था यांनी एकत्रित काम केले तर विकास होऊ शकतो असे मत बाणेरकरांनी व्यक्त केले.

कारणराजकारण मालिकेत कोथरूड विधानसभा मतदारसंघात बाणेर भागातील नागरिकांशी संवाद साधला. सरकार कोणतेही निवडून आले. तरी जर देशात जर विकास करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. 

या भागात  वाहतूकीचा प्रश्न गंभीर आहे. पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. योग्य पध्दतीने कचरा व्यस्थापन होत नाही. पालिकेकडून या प्रश्नाकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाळी चेंबर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. अशा विविध येथे असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KaranRajkaran discussion with citizens of Baner