कारणराजकारण : चिखलफेक नको विकासावर चर्चा हवी

शुक्रवार, 19 एप्रिल 2019

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन काम करावे आणि त्यातून नागरिकांना अधिकाधिक सुविधा द्याव्यात, अशी अपेक्षा विमाननगर परिसरातील रहिवाशांनी कारण राजकारण या मालिकेच्या लाईव्ह वेळी व्यक्त केली. 

विमाननगर : एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन काम करावे आणि त्यातून नागरिकांना अधिकाधिक सुविधा द्याव्यात, अशी अपेक्षा विमाननगर परिसरातील रहिवाशांनी कारण राजकारण या मालिकेच्या लाईव्ह वेळी व्यक्त केली. 

2014 सालच्या निवडणुकांपूर्वी भाजपने प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करू असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले अद्याप समजले नाही. दारिद्र रेषेखालील नागरिकांना वार्षिक 72 हजार रुपये देऊ असे आश्वासन आता काँग्रेसने दिले. दोन्ही पक्षांनी आश्वासणांची खैरात केली, मात्र त्यासाठी पैसे कुठून आणणार हे त्यांनी जनतेला सांगावे. शेतकरी देशोधडीला लागला असून त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन मतदान घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या साठीची एकही योजना यशस्वी झाली नाही. कोणतेच सरकार शेतकऱ्यांसाठी चांगले नाही. पण नाईलाजास्तव मतदानाला जावे लागत आहे, अशी भावना एका शेतकऱ्याने व्यक्त केली.

चांगले रस्ते उखडून मेट्रोची कामे करण्यात येत आहे. बीआरटीमुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. बीआरटी तेवढे प्रभावी ठरली नाही. व्यावसायिकांच्या फायद्यासाठी काही मार्ग एकेरी करण्यात आले, असा आरोप काही महिलांनी केला. तर परिसरात कुठेही स्वच्छतागृहे नाहीत पिण्याच्या पाण्याच्या सुविधा नाहीत त्या सर्व उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KaranRajkaran discussion on local issues by viman nagar citizens