कारणराजकारण : सरकारी योजना फसव्या; स्थानिक प्रश्न कायम

शुक्रवार, 19 एप्रिल 2019

गृहिणींची चुलीच्या धुरापासून सुटका व्हावी म्हणून उज्ज्वला योजना सुरू केली खरी मात्र त्यातून दुसऱ्यांदा गॅस रिफील करून मिळत नाहीत. तसेच येथील स्थानिक प्रश्न देखील सुटले नाहीत, अशा शब्दात येरवडा परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. 

येरवडा : गृहिणींची चुलीच्या धुरापासून सुटका व्हावी म्हणून उज्ज्वला योजना सुरू केली खरी मात्र त्यातून दुसऱ्यांदा गॅस रिफील करून मिळत नाहीत. तसेच येथील स्थानिक प्रश्न देखील सुटले नाहीत, अशा शब्दात येरवडा परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. 

येरवड्यातील वाहतूक प्रश्न वाढतच चालला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहे. तेथील स्वच्छता, पाणी, स्वच्छतागृहे, रस्ते, गटार यांच्याविषयी ठोस उपाय झालेले नाहीत. वंचितांचे प्रश्न इतरांच्या तुलनेत वेगळे आहेत. आमची लढाई मूलभूत बाबी मिळण्यापासूनची आहे. आजही आमच्या मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा नाहीत. 

परिसरातील काही महिलांनी या चर्चासत्रात भाग घेतला. आपले मुद्दे देखील परखडपणे मांडले, परंतु त्यातील काही महिलांना उमेदवार कोण आहेत तसेच निवडणूक कधी आहे, याची कल्पनाच नव्हती. असे असले तरी आम्ही मतदानाचा हक्क नक्की बसणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KaranRajkaran government schemes are fake says citizens of Yerawada