कारणराजकारण : मोदी, राज ठाकरेंच्या प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत : विद्यार्थी

शुक्रवार, 19 एप्रिल 2019

'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या मालिकेत आज (ता. 19) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नमो विरूद्ध रागा अशी चर्चा रंगली.

गणेशखिंड (पुणे) : 'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या मालिकेत आज (ता. 19) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नमो विरूद्ध रागा अशी चर्चा रंगली. मोदी आणि राहुल गांधी यांच्याबरोबरच राज ठाकरे व वंचित बहुजन आघाडी हे दोन फॅक्टर परिणामकारक ठरतील, असे मत येथील विद्यार्थी व प्राध्यापकांनी व्यक्त केले.

'राज ठाकरेंचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे, त्यांच्या सभेत ते पुराव्यानिशी मोदींना सवाल करत आहेत पण मोदी राज यांच्या प्रश्नाबाबत कायमच मौन राखत आहेत. मोदींनी काही केलेच नाही तर ते राज यांच्या प्रश्नांना उत्तरे कशी देतील,' असाही सवाल तेथील विद्यार्थ्यांनी मांडला. तर बिनबुडाचे आरोप न करता मोदींविरोधातील पुरावे दाखल करा जर ते वैध असतील तर, त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असेही एका विद्यार्थ्याने सांगितले.

अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी ही निवडणूक ट्रायल असेल, विधानसभेच्या निवडणूकीत याचा परिणाम होईल व त्यासाठीची ही तयारी आहे, असे मत एका प्राध्यापकांनी व्यक्त केले. शिक्षणासाठी प्रचंड गुंतवणूकीची गरज आहे, आजचा तरूण म्हणजे उद्याचा भारत आहे, त्यासाठी व्यवस्थित गुंतवणूक करण्याची गरज आहे असे शिक्षणाबाबत प्राध्यापकांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KaranRajkaran Namo vs Raga debate at Savitribai Phule Pune University