कारणराजकारण : किल्ले शिवनेरीकडे सरकारचे दुर्लक्ष : जुन्नरवासी (व्हिडिओ)

शुक्रवार, 12 एप्रिल 2019

शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरीचा विकास अद्याप झालेला नाही. तो होणे अत्यंत गरजचे आहे. त्याचबरोबर जुन्नर शहराचा देखील विकास होण्याची गरज असल्याचे जुन्नर येथील स्थानिक नागरिकांनी केली.

पुणे : शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरीचा विकास अद्याप झालेला नाही. तो होणे अत्यंत गरजचे आहे. त्याचबरोबर जुन्नर शहराचा देखील विकास होण्याची गरज असल्याचे जुन्नर येथील स्थानिक नागरिकांनी केली. तसेच बाहेरुन येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास स्थान, पार्किंग सुविधा, शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा, आणि गडावर जाण्यासाठी 'रोप वे' निर्माण, या गोष्टी येथे होण्याची गरज असल्याचे या नागरिकांनी सांगितले. 

राज्य आणि राज्याबाहेरुन येणाऱ्या शिवभक्तांची संख्या खुप मोठी आहे. मात्र, सत्तेत कोणताही पक्ष असला तरी गडाचा आणि परिसराचा विकास झाला नसल्याची खंत जुन्नरच्या नागरिकांनी व्यक्त केली. कारणराजकारण या 'सकाळ'च्या उपक्रमामध्ये येथील सुनिल ढोबळे, सचिन गीरी, अंबर परदेशी या नागरिकांनी सहभाग घेतला होता.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ'च्या टिमने शिवनेरी किल्ला आणि जुन्नर शहराच्या विकासाबाबत नागरिकाशी चर्चा केली. यावेळी सुनिल ढोबळे म्हणाले, "जुन्नर शहराला फार जुना इतिहास असून शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळामुळे जुन्नर जगभर परिचित झाले. मात्र, सरकारच्या दुर्लक्षामुळे शिवनेरी आणि जुन्नरचा विकास झाला नाही." पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यात करण्यात आल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सकाळ ची टिम जुन्नर मध्ये पोचली तेव्हा किल्ले शिवनेरीच्या जंगल परिसरामध्ये वनवा लागलेला होता. त्यामुळे किल्ल्याच्या परिसरातील काही भाग जळून गेला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karanrajkaran Shivneri fort ignored by government says villagers of junnar