Election Tracker : अखिलेश यादव आज काय म्हणाले?

akhilesh_yadav
akhilesh_yadav

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  काय म्हणाले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव

अखिलेश यादव : 25 एप्रिल
विकास विचारतोय : आपण काही नवीन ऐकले आहे का? असे ऐकण्यात येत की भाजपाचा नवीन अर्थ काढला जात आहे. 'भागती जनता पार्टी' कारण प्रधामंत्री बातमी पासून पळत आहे, तर त्यांचे नेते पत्रकारांच्या प्रश्नांपासून पळत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते 15 लाख व रोजगार मागणाऱ्या जनतेपासून पळत आहे.

21 महिन्यात आम्ही एक्सप्रेस वे बनवीला होता. पण मागील दोन वर्षांपासून जतना 5 कोटी मोकळ्या जनावरांपासून त्रस्त आहे. जर सरकार राजकीय कार्यक्रमात घुसणारे सांड रोखू शकत नसेल तर गरीब शेतकऱ्यांनाचे काय हाल होत असले हे त्यांनाच माहीत.

अखिलेश यादव : 24 एप्रिल
विकास विचारतोय : प्रधानजी या मुलाला ओळखले का? हा तोच मुलगा आहे ज्याचा जन्म नोटबंदीच्या रांगेत झाला होता. आता तोही भाजपच्या विरोधात मत द्यायचा हट्ट करु लागलाय. त्यावर आम्ही म्हणाले, बाळा तु आजून लहान आहेस. आणि तसही आपले वाईट करणाऱ्याचे वाईट करावे ही चांगील गोष्ट नाही.

अखिलेश यादव : 23 एप्रिल
पारदर्शक आणि निपक्षपाती मतदान करणे हा लोकशाहीचा पाया आहे. या अधिकारा शिवाय लोकाशाहीला काहीही मत्त्व नाही. याची रक्षा करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. आज कुटुंबासोबत हा विश्वास घेऊन मतदान केल की देशात महापरिवर्तन येणार आहे.

अखिलेश यादव : 22 एप्रिल
विकास विचारतोय : तुम्हाला माहित आहे का भाजपचे समर्थक यावेळी मतदान का करत नाहीत? कारण मागील पाच वर्षात जेवढी काही वाईट काम, विचारांमुळे शेजारी, मित्रांपासून कटुता ओढून घेतली आहे. पण आता भाजप पुर्णता हारत असताना यांचा सामना कुठल्या तोंडाने करावा असा प्रश्न त्यांना पडला आहे.

अखिलेश यादव : 21 एप्रिल
भाजप दलित आणि मागासवर्गीयांना पुढे जाताना पाहू शकत नाही. भाजप नेत्यांनी त्यांच्या भाषेमधून या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. आणि यातूनच त्यांना आपण हरणार असल्याची जाणिव झाली आहे. लवकरच जनता त्यांना आणि त्यांच्या विचारधारेला उत्तर देईल.

अखिलेश यादव : 19 एप्रिल
आज मैनपुरीतील महारॅली मध्ये जगाने ज्याप्रमाणे गरीब-शोषीत आणि वंचितांचा महासंगम पाहिला आहे. हा महासंगम भारतीय राजकारणात येणाऱ्या युगांसाठी महापरिवर्तनकारी ठरणार आहे. सपा आणि बसपाची महायुती देशाला नवीन नेतृत्त्व आणि दिशा प्रदान करणार आहे.

अखिलेश यादव : 18 एप्रिल
आज आजमगड मधील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आघाडीतील एकता आणि उत्साह पाहून वाटू लागले आहे की भविष्यातील एक अभूतपुर्व विजयाचा इतिहास लिहीला जाणार आहे. आघाडी सोबत आलेल्या सर्व कार्यर्ते आणि समर्थकांचे आभार.

अखिलेश यादव : 17 एप्रिल
विकास विचारतोय: प्रधानजी खूपच 'उडान-उडान' बोलत होते. मग जेय एअरवेजला वाचविण्यासाठी हजारो कर्मचाऱ्यांची आवाज का ऐकत नाहीत. असे वाटते प्रधानजी त्यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त रोजगार काढून घेण्याचा विश्वविक्रम करुणच कायमचे जाणार आहेत.

अखिलेश यादव - 15 एप्रिल
निवडणूक आयोगाने मायावती यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन दिवस प्रचार बंदी घातली. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मत देणाऱ्या मतदारांना तुमचे पहिले मत पुलवामा मध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पीत होऊ शकते का? असे म्हणूण देखील त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप होत नाही.

अखिलेश यादव - 7 एप्रिल
निवडणुकांपुर्वी हे सगळे चौकीदार झाले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक चौकीदाराची चौकी काढून घेण्याचे काम आम्ही यंदाच्या निवडणुकीत करणार आहोत. सध्या द्वेष पसरवणारे नेते आले असून, त्यांच्याकडून तिरस्कार पसरविण्याशिवाय काहीच केले जात नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक इतिहास घडवू शकते. हा इतिहास लिहिण्याची संधी आपल्याकडे आहे. (जाहीर सभा)

अखिलेश यादव - 4 एप्रिल
विकास विचारतोय : पंतप्रधानांचे अच्छे दिन वाले घोषणा पत्र काय निवडणूका झाल्यावर येणार आहे का? यावेळी तर भाजपमधील लोक एक दुसऱ्यांनाही म्हणू शकत नाहीत की अच्छे दिन आने वाले है, तर जनतेशी काय सांगणार. यातून भाजपचा उल्टा प्रवास सरु झाला आहे.

अखिलेश यादव - 3 एप्रिल
एक बाजूला वाढती बेरोजगारी तर दुसरीकडे लोकांच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रयत्न, नोटबंदी मध्ये गरीबांचे हजारो रुपये लुबाडले आणि बीएसएनएल च्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागण्याची परिस्थिती. असताना केवळ निवडणूक संपण्याची वाट पाहत आहोत.

अखिलेश यादव - 2 एप्रिल
विकास विचारतोय : मागील पाच वर्षांमध्ये असे रस्ते का नाही बनू शकले ज्यावरून चालताना छाती पुढे करून चालता येऊ शकेल? बहुतेक त्यांना असा रस्ताच नको आहे ज्यावरून कोणीतरी दिल्लीला लवकर पोहचेल.

अखिलेश यादव- 31 मार्च
'विकास विचारतोय' : जिथे सत्ताधारी मागील पाच वर्षांपासून जनतेला एप्रिल फुल बनवत आहेत, तिथे एका दिवसाचे काय महत्त्व? परंतु, यावेळी जनता फुल बनविणाऱ्यांच्या फुलाचा रंग आणि होश उडविण्यासाठी फुल तयार आहे.

अखिलेश यादव - 29 मार्च

अखिलेश यादव - 28 मार्च

अखिलेश यादव - 27 मार्च

अखिलेश यादव - 26 मार्च
भाजपचे लोकसभा निवडणूकीतील मुद्दे : 1) विरोधक 2) विरोधक
चौकीदार भाजपचे प्रचारक : 1) राज्यपाल 2) सरकारी संस्था 3) मिडीया
भाजपची निवडणूकीची व्यूहरचन : 1) सोशल मीडिया 2) द्वेष 3) पैसा
भापचची पाच वर्षातील यश : 1) झुंडशाही 2) शतकऱ्यांचा अपमान 3) बेरोजगारी 
भाजपवर टिका करताना त्यांनी असे मुद्दे मांडले आहेत.

अखिलेश यादव - 25 मार्च
'विकास' विचारतोय... भाजप आपल्या प्रचारसभांमध्ये विरोधी पक्षांवरच का बोलत आहेत? भाजपच्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात एकही सकारात्मक काम झाले नाही का? जनतेचा आक्रोश आणि हारण्याच्या भीतीने भाजपचे नेते आणि कार्यकर्ते गर्मी वाढल्याचे नाटक करून निवडणूक प्रचारापासून पळ काढत आहेत.

अखिलेश यादव - 23 मार्च

अखिलेश यादव - 22 मार्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की कोणत्या विचारधारेनुसार चालू पाहत आहेत हे लक्षात येत नाही. एका बाजूला गांधीजी, भगतसिंग, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबडकर आणि डॉ. लोहिया यांना स्विकारण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे अशा लोकांचा सन्मान केला जातो ज्यांनी या सर्वांना उघडपणे विरोध केला. आपण डॉ. लोहिया यांनी लिहिलेल्या 'हिंदू बनाम हिंदू' या पुस्तकातील पहिले पान तर वाचले असेल.

अखिलेश यादव - 19 मार्च
मायावती यांनी आयुष्यभर मागासवर्गीय, गरीब आणि महिलांचा सन्मान व भागीदारी साठी संघर्ष केला आहे. त्यांनी जे वर्ग वंचित समाजाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला. भाजप समाजाला मागे घेऊन जाऊ पाहते आहे. जे की आम्ही #MahaParivartan च्या माध्यमातून एका चांगल्या भविष्यासाठी लढत आहोत. 

अखिलेश यादव - 18 मार्च
उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा या दोन्ही पक्षांची युती भाजपला हरविण्यासाठी सक्षम आहे. काँग्रेस पक्षाने यामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये.

एका बाजूला काही मंत्री नाव बदलण्यात व्यस्त असताना दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करण्याची परवाणगी मागण्यसाठी हतबल झाला आहे. दिवसभर शेतात कष्ट आणि चौकीदारी करून अन्नदात्याचे पोट भरत नाही. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे जिथे देशाचे पोट भरणारा शेतकरी उपाशी मरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com