Madha Loksabha 2019 : संजयमामा की रणजितसिंह? चारपर्यंत 44.10 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

माढा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये दुपारी दोनपर्यंत करमाळा 33.96, माढा 34.51, माळशिरस 34.73, माण 31.14, फलटण 35.12 आणि सांगोला 30.95 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर देशाचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात दुपारी चारपर्यंत 44.10 टक्के मतदान झाले आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये दुपारी दोनपर्यंत करमाळा 44.20, माढा 46.57, माळशिरस 45.12, माण 41.12, फलटण 45.40 आणि सांगोला 42.12 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

माढ्यामध्ये विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंना कडवी लढत दिली आहे. या लढतीकडे देशाचे लक्ष यामुळे लागले आहे कारण शरद पवार यांनी येथून माघार घेतली होती. राष्ट्रवादीचा गड असलेल्या माढ्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे देशाचे लक्ष आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madha Loksabha constituency voting begins Sanjay Shinde and RanjitSingh Nimbalkar fight