Loksabha 2019 : महिषासुराचा पराभव बंगाली दुर्गेने करावा : चंद्राबाबू नायडू

पीटीआय
शनिवार, 11 मे 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे महिषासूर असून, देशात शांतता आणण्यासाठी त्यांना "बंगाली दुर्गे'ने (पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) पराभूत करायला हवे, अशी टीका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केली. 

अमरावती (आंध्र प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे महिषासूर असून, देशात शांतता आणण्यासाठी त्यांना "बंगाली दुर्गे'ने (पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) पराभूत करायला हवे, अशी टीका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केली. 

विरोधकांच्या महाआघाडीबाबत नायडू यांनी आज ममता बॅनर्जी यांच्याबरोबर खड्‌गपूरमध्ये बंदद्वार चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही टीका केली. "मोदींना मानसिक आजार झाला असून, निवडणुकीत पराभूत होण्याच्या भीतीमुळे ते अशी विधाने करत आहेत,' असा टोला नायडूंनी मारला. नायडू यांनी मोदींचा उल्लेख "महिषासूर' आणि ममता बॅनर्जी यांचा उल्लेख "बंगाली दुर्गा' असा केल्याचे तेलुगू देसमच्या अधिकृत ट्‌विटर हॅंडलवर म्हटले आहे.

मात्र चंद्राबाबूंना लोक गांभीर्याने घेत नाहीत, ते काय बोलत आहेत हे त्यांनाच कळत नाही, असा टोला भाजपचे आंध्र प्रदेशाध्यक्ष कन्ना लक्ष्मीनारायण यांनी लगावला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahishasura should be defeated by the Bengali people says Chandrababu Naidu