Loksabha 2019 : आ. भालके घेणार का विखे-पाटलांची जागा?

हुकूम मुलाणी 
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

मंगळवेढा : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या जागी पंढरपूर मंगळवेढा आ. भारत भालके यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात असून त्याच्या समर्थकाचे काँग्रेसच्या नेत्याच्या निर्णायकाकडे लागले.

मंगळवेढा : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या जागी पंढरपूर मंगळवेढा आ. भारत भालके यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात असून त्याच्या समर्थकाचे काँग्रेसच्या नेत्याच्या निर्णायकाकडे लागले.

सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या कारभाराबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या प्रमाणे आक्रमक असलेल्या आ. भारत भालके हे कोणत्याही प्रश्नासाठी सरकारविरोधी आक्रमक होत असून आपली भुमिका प्रभावीपणे मांडत आहेत.हे विधानसभेत यांच्या उपस्थितीत प्रश्नावरून दिसून येत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये सध्या त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो आणि त्या नावाला माजी कृषीमंत्री शरद पवार आणि माजी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे हे सहमती दर्शवतात.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात भाजपाचे प्रबळ नेते एकत्र झाले असतानाही मंगळवेढा पंढरपुर मतदारसंघाचे सरकारविरोधी वातावरण तयार करून त्यांना त्याचा लाभ शिंदेना होण्यासाठी प्रयत्न केले. विद्यमान सरकारच्या कारभारातील कर्जमाफी, जनावरांच्या छावण्या, मराठा, धनगर, मुस्लिम, समाजाचे आरक्षण, आरोग्य, शिक्षण आणि प्रश्नावर सरकारच्या कारभाराबद्दल विधानसभेत जोरदार आवाज उठवला असून मुख्यमंत्र्याला मराठा समाजाला आरक्षणावरून मुख्यमंत्र्याला पंढरपूरच्या महापूजेस येण्यापासून रोखले होते. तर भाजीविक्रेत्या महिलेस न्याय द्यावा म्हणून पोलिस अधिकाऱ्यांनी देखील दमबाजी केली. त्यामुळे त्याचे नेतृत्व स्थानिक जनतेच्या पसंतीस उतरले. सध्या काॅग्रेसला आक्रमक नेतृत्व असलेल्या आ. भारत भालके सारख्याच विधानसभेत गरज असून त्याच्याकडे अनुभव असल्याने यांचा या ठिकाणी संधी मिळू शकते असे त्यांचे समर्थकही बोलू लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bhalake possibility;ity to take position of Vikhe Patil