Loksabha 2019 : मोदी म्हणतात, 'अजून मी जिंकलेलो नाही; कृपया मतदान करा!'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

'आता नरेंद्र मोदी जिंकून आलेच आहेत आणि त्यामुळे आता मतदान केले नाही, तरीही चालू शकेल, अशी वातावरणनिर्मिती काहीजण करू लागले आहेत. कृपया असलं काहीही करू नका', असे मिश्‍किल आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) केले.

वाराणसी : 'आता नरेंद्र मोदी जिंकून आलेच आहेत आणि त्यामुळे आता मतदान केले नाही, तरीही चालू शकेल, अशी वातावरणनिर्मिती काहीजण करू लागले आहेत. कृपया असलं काहीही करू नका', असे मिश्‍किल आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) केले. मोदी यांनी आज शक्तिप्रदर्शन करत वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. 

अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'आता मोदी जिंकलेच असे वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे आता मतदान केले नाही, तरीही चालू शकेल असेही सांगितले जात आहे. कृपया असे काहीही करू नका. मतदान करणे हा तुमचा अधिकार आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सवा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करायला हवे. देश मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे.'' 

अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदी यांनी वाराणसीमध्ये जोरदार 'रोड शो' केला. याविषयीही त्यांनी भाष्य केले. 'वाराणसीतील मतदारांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता पाच वर्षांनंतर पुन्हा त्यांनी असेच आशीर्वाद मला दिले आहेत', असे मोदी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi appeals to vote in Varanasi