Loksabha 2019 : मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 April 2019

पुणे : " विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देऊ नका, असे म्हणत असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली. शहीदांचा अवमान करणाऱ्या साध्वीचे समर्थन पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्यांना लाज कशी वाटत नाही. मोदी आणि भाजपने महाराष्ट माफी मागावी आणि प्रज्ञासिंह यांची उमेवारी मागे घ्यावी,' अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केले. 
 

पुणे : " विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देऊ नका, असे म्हणत असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली. शहीदांचा अवमान करणाऱ्या साध्वीचे समर्थन पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्यांना लाज कशी वाटत नाही. मोदी आणि भाजपने महाराष्ट माफी मागावी आणि प्रज्ञासिंह यांची उमेवारी मागे घ्यावी,' अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केले. 

काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचाराची सांगता सभेत चव्हाण बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,वंदना चव्हाण, रमेश बागवे,चेतन तुपे, बाळासाहेब शिवरकर, शरद रणपिसे, दिप्ती चवधरी, अंकुश काकडे, प्रविण गायकवाड यांच्यासह नेते मंडळी उपस्थित होते. तीन माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्र आणि राज्यातील सरकारवर जोरदार टिका केली. 

निवडणूक हातातून जात असल्याने भाजप धार्मिक धुव्रीकरण करून देशात तेड निर्माण करीत आहेत, अशी टिका करून चव्हाण म्हणाले," पुलवामा प्रकरणात गुप्तचर खात्याकडून आधी माहिती मिळाली होती. परंतु निष्काळजीपणा झाला, हा कोणी निष्काळजीपणा केला, की जाणीवपूर्वक तो केला गेला याची चौकशी झाली पाहिजे.'' 
अशोक चव्हाण म्हणाले," मुख्यमंत्र्यांनी नुसतीच कर्जमाफीची घोषणा केली. दोन वर्षांपासून ते अभ्यासच करीत आहेत. आता अभ्यास कसला करताय, तुम्ही नापास झाला आहात. तुम्हाला घरी बसावे लागेल. राज्यातील गुंतवणूक थांबली आहे. विकासात शहर मागे पडत आहे. पुण्यातील युतीचे उमेदवार कधी कोणाचा हात धरतील याचा नेम नाही. संविधान जाळण्यापर्यंत मजल गेलेल्या मोदीं, शहा या हुकुमशाहांना घरी बसवून लोकशाही टिकविण्यासाठी महाआघाडीला साथ द्या.'' 

तर सुशिलकुमार शिंदे म्हणाले," जाती,धर्माच्या नावावर कोणालाही निवडून देऊ नका. या निवडणूकीतून पुन्हा हुकुमशाह निवडून येणार नाही याची काळजी घ्या. लोकसभेच्या पहिल्या पायरीवर डोके ठेवणाऱ्यांनी प्रत्यक्ष संसदेत हुकुमशाही सुरू केली. मोदींना हिटलर बनायचे आहे. आडवाणीसारख्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसविण्याचे पाप मोदींनी केले. जे ज्येष्ठांचा सनमन करीत नाही. तो मतदारांचा सन्मान काय करणार.'' 

मोदीं-शहांना पकोडे तळण्यासाठी पाठवा- चव्हाण 
यावेळी अशोक चव्हाण म्हणाले,"" सबका साथ, सबका विकास म्हणाऱ्यांनी सर्वांची साथ घेतली आणि स्वत:चा विकास केला. पक्ष श्रीमंत झाला. आता त्याच पैसाच्या जोरावर भाजपवाले निवडणूक लढत आहेत. तरूणांना समोसे, भजी तळा म्हणाऱ्या मोदीं, शहाना सत्तेवरून खाली खेचा आणि त्यांनाच तुमच्या दुकानावर सामोसे, भजी तळायला पाठवा.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi should apologize to Maharashtra Says to Prithviraj Chavan