Loksabha 2019 : मोदींची अवस्था गजनीतल्या आमीर खान सारखी : धनंजय मुंडे

रमेश मोरे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

मोदींची अवस्था गजनी चित्रपटातल्या आमिर खान यांच्यासारखी झाली आहे.- धनंजय मुंडे

जुनी सांगवी : सत्ता मिळण्याआधी मोदींना काय बोलावे याचे भान नव्हते. लोकांना खोटी स्वप्ने दाखवत त्यांनी सत्ता मिळवली. पाच वर्षे जनतेला झुलवत ठेवले. अच्छे दिन, सबका साथ सबका विकास म्हणत खोटे बोलून सत्ता मिळवली. पण आपण काय बोललो याचे  त्यांना भान राहिले नाही. त्यामुळे आज मोदींची अवस्था गजनी चित्रपटातल्या आमिर खान यांच्यासारखी झाली असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दापोडी येथे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारसभे बोलताना केली.

मुंडे यांनी, अच्छे दिन, नोटा बंदीच्या निर्णयावर भाजपावर सडकून टीका केली. तर आमीर खानला जसं सिनेमाच्या सुरूवातीच आणी मध्यांतरानंतरच काहीच माहीत नसते तसच मोदींचे असल्याची टीका त्यांनी केली. अच्छे दिन, बेरोजगारी, वाढते गँस दर, महागाईवर आत्ता भाजपावाल्यांची तोंड बंद आहेत. सेना भाजपांचे खोटारडेपणा जनतेनी हाणून पाडावा. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ दापोडी येथील त्रिरत्न सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सक्षणा सलगर, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, स्थानिक नगरसेवक रोहित काटे, माई काटे, राजू बनसोडे, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे शेखर काटे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modis condition is like Amir Khan in Ghajini says Dhananjay Munde