Loksabha 2019 : 'न्याय'चा लाभ बेरोजगार युवकांना अधिक : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

जालोर (राजस्थान) (पीटीआय) : कॉंग्रेस पक्षाच्या प्रस्तावित किमान उत्पन्न योजना (न्याय) याचा सर्वाधिक लाभ देशातील बेरोजगार युवकांना मिळेल, असा दावा आज कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
 
राहुल यांनी जालोर येथील एका प्रचार सभेत म्हटले, की कॉंग्रेसने देशातील पाच कोटी गरीब कुटुंबांसाठी योजना तयार केली आहे. या योजनेनुसार दरमहा 6 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. ही योजना तयार करताना अर्थशास्त्रज्ञांशी चर्चा केली आहे. या योजनेचा फायदा केवळ देशातील 25 कोटी गरिबांना मिळणार नाही; तर शेतकरी, लहान व्यापारी आणि सर्वाधिक बेरोजगार युवकांना होईल.

न्याय योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पैशातून अर्थव्यवस्था रुळावर येईल आणि बेरोजगारांना रोजगार मिळण्यास हातभार लागेल. केंद्रात कॉंग्रेस सरकार आल्यास दरवर्षी 22 लाख युवकांना सरकारी नोकरी दिली जाईल. ही पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याचे राहुल गांधी म्हणाले. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे गरिबांच्या खिशातून पैसा काढला गेला. गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने देशातील सर्वच क्षेत्रांतील नागरिकांवर अन्याय केल्याचे राहुल म्हणाले. 

राहुल गांधी उद्या अमेठीत 
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे 27 एप्रिल रोजी अमेठीच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी हे जगदीशपूर आणि गौरगंज येथे सभा घेणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल यांचा तिसरा अमेठी दौरा आहे. अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी रिंगणात आहेत. अमेठीत 6 मे रोजी मतदान होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The more benefit of NYAY scheme to the unemployed youth says Rahul Gandhi