Loksabha 2019 : मोदी पंतप्रधान होणार नसल्याने मुकेश अंबानींचा काँग्रेसला पाठिंबा : राज ठाकरे

Tuesday, 23 April 2019

मुंबई : भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा का देतात? मोदी पंतप्रधान होणार नसल्यानेच आता एखादा उद्योगपती उघडपणे मोदींना पाठिंबा देत आहेत, असा तर्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्तविला.

मुंबईत राज ठाकरे यांची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिलीच सभा झाली. या सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर राज यांनी आतापर्यंत टीकास्त्र सोडले आहे. आताही त्यांनी या दोघांनाच लक्ष्य केले.

राज म्हणाले, की मुकेश अंबानी काँग्रेसच्या बाजूने असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोदी का पंतप्रधान हवे आहेत. हेच मोदी म्हणाले होते माझी 56 इंचाची छाती आहे. मनमोहनसिंगांना म्हणायचे, एक मारले तर चार मारा. आता हेच मोदी शपथविधीला पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बोलवितात आणि त्यांच्या वाढदिवसाला बिर्याणी खायला गेले. काय म्हणत असतील, जवानांच्या कुटुंबियांना.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Ambani Give Supports to Congress because he know Modi will not Become PM again says Raj Thackeray