Loksabha 2019 : माझी संपुर्ण ताकद कांचन कुल यांच्यामागे उभी करणार : जानकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

बारामती शहर : एकदा युती केल्यानंतर गद्दारी करण्याचा माझा स्वभाव नाही त्यामुळे मी कांचन कुल यांच्याच मागे माझी जी काही ताकद आहे ती उभी करणार आहे, अशी स्पष्ट भूमिका पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व्यक्त केली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान राहुल कुल हे राष्ट्रीय समाज पक्ष सोडू शकत नाही, ते कायम माझ्यासोबत याच पक्षात राहतील असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

मी युतीसोबत असलो तरी मी माझे कपबशी हे चिन्ह सोडणार नाही, त्यावर मी ठाम आहे मात्र महाराष्ट्रात युतीच्या बाजूने ताकद उभी करणार असून बारामती व माढ्याला जास्त वेळ देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माझ्या पक्षाला भविष्यात तिकीट दिले किंवा नाही दिले तरी आगामी पाच वर्षे भाजपसोबतच राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठ्या भावाप्रमाणे माझ्या सोबत आहेत, त्यांना सांगितल आहे की ज्या दिवशी तुम्हाला माझ्या पक्षाचा धोका वाटेल त्या दिवशी मीच पक्ष सोडून निघून जाईल. 

धनगर समाजासाठी देवेंद्र फडणवीस व महादेव जानकर यांनी ज्या सवलती आदिवासी समाजाला दिलेल्या आहेत, त्या देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.आचारसंहिता संपल्यावर त्याचे चित्र स्पष्ट होईल, पण ज्या समाजाने तुमच्यावर इतके अतोनात प्रेम केले त्यांच्यासाठी तुम्ही अशी अर्थसंकल्पीय तरतूद का केली नाही, असा सवाल जानकर यांनी शरद पवार यांना या वेळी केला.

तिकीट देणारा आहे, तिकीट मागणारा नाही. त्यामुळे मी तिकीट मागत बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले. बारामती मतदारसंघात बंड होऊ शकते व सुप्रिया सुळे मागे पडू शकतात हा आत्मविश्वास माझ्यामुळेच निर्माण झाला आहे. माझ्या अगोदर भाजपचे अनेक नेते लढले पण युवकात आत्मविश्वास महादेव जानकर यांनीच निर्माण केला. मला शरद पवार यांच्याविषयी आदर आहे ते वडीलधारे नेते आहे, मात्र त्यांनी धनगर समाजाच्या एकाही व्यक्तीला लोकसभेवर का नाही पाठवले, असा सवाल त्यांनी केला. बारामती हा माझा अस्मितेचा मतदारसंघ असल्याने मी बारामतीत प्रचाराला आलो आहे, मी नाराज आहे अशा बातम्या मी वाचल्या त्याचे खंडण करण्यासाठीच आज दिवसभरात चार सभा घेतल्या आहेत असेही जानकर म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My full support to Kanchan Kool says Mahadev Jankar