Loksabha 2019 : नगरमध्ये काँग्रेसला धक्का; जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 April 2019

- सराणे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का.

अहमदनगर : जिल्हा काँग्रेसचे नवनिवार्चित अध्यक्ष करण ससाणे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, पक्ष सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. ससाणे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसला चांगलाच झटका बसला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नावाने राजीनामा दिला आहे. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रचारादरम्यान साईबाबांच्या झोळीत हात घालणाऱ्याचे कधीच चांगले झाले नाही, असे वकतव्य केले होते. यामुळे जिल्हाध्यक्ष करण ससाणे समर्थक नाराज होते. त्यामुळे समर्थक कांबळे यांचे काम करणार नसल्याची भूमिका याआधीच जाहीर केली होती. समर्थकांची भावना लक्षात घेऊन राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पूर्वीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांना हटवून करण ससाणे यांची नुकतीच जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल ससाणे समर्थकांचा मेळावा घेतला होता. तर आज शिर्डी येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर ससाणे यांनी राजीनामा दिला. करण ससाणे यांचे वडील दिवगंत आमदार जयंत ससाणे साईबाबा संस्थानचे सात वर्षे अध्यक्ष होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar District President Karan Sasane Resigned from Congress Party