ModiWithSakal : महाराष्ट्रात फडणवीस सरकारची कामगिरी उत्तम : मोदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत.

प्रश्‍न : महाराष्ट्रात एनडीएला किती यश मिळेल असे आपल्याला वाटते? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीविषयी तुमचे मत काय आहे? आणि असे बोलले जाते, की पुन्हा केंद्रात आपले सरकार आले, तर मुख्यमंत्र्यांना दिल्लीत नेले जाईल, याबाबत आपण काय सांगाल?

उत्तर : पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं राज्य आहे. या राज्याला देता येईल तितकी ताकद द्यायला हवी. ते देशासाठी महत्त्वाचं आहे. अशा राज्यात अस्थिरता असता कामा नये. एक प्रकारे महाराष्ट्रात एका पक्षाचे सरकार आहे. शिवसेना सोबत आहे; पण एका प्रकारे एका पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या सरकारसारखे कटू अनुभव लोकांना येत नाहीत. भाजपची सर्व राज्य सरकारे चांगली कामगिरी करताहेत. काहीतरी नवे घडवताहेत. देवेंद्र फडणवीस यातीलच एक आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होतो आहे. राहिला भविष्यातला मुद्दा. माझं मत असंच आहे, की महाराष्ट्राला स्थैर्याची गरज आहे. अस्थिर करण्याची आवश्‍यकता नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi opens up about Fadnavis government an exclusive interview with Abhijit Pawar