ModiWithSakal : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार : मोदी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 May 2019

प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. 

प्रश्न : शेतीवरील संकटाचा मुद्दाही विरोधकांकडून पुनःपुन्हा मांडला जातो. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे जे केले आहे, त्यावर तुम्ही समाधानी आहात का?
उत्तर : आम्ही शेतीसाठी आतापर्यंत जे जे केलं आहे त्यावरूनच आमचं मूल्यमापन व्हायला हवं. २००९ ते २०१४ या पाच वर्षांत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सराकरनं फक्त ३,११७.३८ कोटी रुपये किमतीच्या ७.२८ लाख मेट्रिक टन इतक्‍या डाळी आणि तेलबियांची खरेदी किमान आधारभूत किंमत देऊन केली होती. २०१४-१५ ते २०१८-१९ दरम्यान आमच्या सरकारनं ४४,१४२.५० कोटी रुपयांच्या ९३.९७ लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबिया खरेदी केल्या. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने १५ वर्षांत अन्नधान्य खरेदीवर ४५० कोटी रुपये खर्च केले. मात्र भाजप-शिवसेनेच्या सरकारनं फक्त ३ वर्षांत ८५०० कोटी रुपयांचे अन्नधान्य खरेदी केले.

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा आमचा निर्धार आहे. त्यासाठी मोठे प्रयत्नही होत आहेत. देशातील लहान शेतकऱ्यांकरिता आम्ही पंतप्रधान किसान योजना आणली आहे. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये पैसे जमाही झाले आहेत. आमच्या संकल्पपत्रात आम्ही ही योजना सर्व शेतकऱ्यांना लागू करण्याचं वचनही दिलं आहे. संकल्पपत्रात आम्ही शेतकऱ्यांसाठी निवृत्तिवेतनाची योजना जाहीर केली आहे. हा निर्णय ऐतिहासिक तर आहेच, पण यामुळे शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा होण्याच्या दृष्टीनेही दूरगामी परिणाम दिसून येतील. किसान क्रेडिट कार्डद्वारे आम्ही शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्जेही देणार आहोत. शिवाय कृषी ग्रामीण क्षेत्रात २५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचाही आमचा निर्धार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi opens up about Farmers policy in an exclusive interview with Abhijit Pawar