ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. 

प्रश्न : पाच वर्षांतल्या कल्याणकारी योजनांच्या बळावर या निवडणुकीत यश मिळेल असे तुम्हाला वाटते का?

उत्तर : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत, असं मला वाटतं आणि आम्ही आमच्या कामगिरीच्या आधारेच मतं मागत आहोत. आणि मला पूर्ण खात्री आहे. २२ कोटी लोकांपर्यंत आम्ही कोणती ना कोणती योजना थेट पोचवली आहे आणि योजना म्हणजे नुसत्या रेवड्या वाटप नाही. त्यात सक्षमीकरण आहे. जशी घरं दिली. आता घर दिलं की मग थोडी बचत केली आणि खुर्च्या आणल्या, आणखी थोडे पैसे वाचवले पडदे लावले, याचा अर्थ त्या माणसाच्या आकांक्षांना बळ मिळतं. आम्ही घरं दिली. काँग्रेसनं दहा वर्षांत पंचवीस लाख घरं दिली. आम्ही पाच वर्षांत दीड कोटी घरं दिली. अशीच उज्ज्वला योजना आहे. ऊर्जा योजना आहे. वीज पोचवायची. एलईडी बल्ब. काँग्रेसच्या काळात एलईडी बल्ब साडेतीनशे रुपयांना मिळत असे, आज ४०-५० रुपयांना मिळतो. आणि आम्ही कोट्यवधी एलईडी बल्ब वितरित केले आहेत. एखाद्या निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार केला तर साधारणतः एका वर्षाचा विजेवरचा त्यांचा दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च वाचला आहे. या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. दुसरा मुद्दा महागाईचा. २०१४च्या निवडणुकीच्यावेळी मी भाषणं करायचो तेव्हा मी १५ मिनिटं महागाईच्या मुद्द्यावर बोलत असे, डाळीच्या भावांवर बोलत असे. या निवडणुकीत पूर्ण हिंदुस्तानात एकही पक्ष महागाईवर बोलत नाहीये. ही खरंतर आमची मोठी अॅचिव्हमेंट आहे. विचार करा महागाईचा दर १० टक्केच राहिला असता, तर मला नाही वाटत अगदी एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबालाही त्याच्या इच्छेप्रमाणे जेवता आलं असतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi opens up about government schemes in an exclusive interview with Abhijit Pawar