ModiWithSakal : भारताला शिखरावर न्यायचे ही माझी राष्ट्रवादाची व्याख्या : मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 

पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 

प्रश्‍न : आपण प्रचारात राष्ट्रवादावर भर देत आहात. राष्ट्रवादावर भर देत अन्य प्रश्‍नांवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न नाही काय?

उत्तर : एकतर राष्ट्रवाद म्हणजे भारतमाता की जय. भारतमाता की जय म्हणायचे आणि देश अस्वच्छ ठेवायचा तर तो राष्ट्रवाद नव्हे. मी स्वच्छतेचं काम करतो. माझ्यासाठी स्वच्छतेचं काम राष्ट्रवाद आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीला एक असं स्वरूप दिलं की कोणी खादी वापरली तर तो आझादीचा शिपाई, चरखा चालवला तर आझादीचा शिपाई, कोणी प्रौढ शिक्षणाचं काम करेल तर तोही आझादीचा शिपाई. हे गांधींनी केलं होतं. मीही मानतो, की गरिबांसाठी मी घरं बांधली तर तो माझा राष्ट्रवाद आहे. गरिबांघरी वीज पोचवणं हा माझा राष्ट्रवाद आहे. भारताला शिखरावर न्यायचे ही माझी राष्ट्रवादाची व्याख्या आहे. भारताला शिखरावर न्यायचं म्हणजे इथल्या सगळ्या समस्यांची सोडवणूक करायची. शिखरावर न्यायचं म्हणजे इथं जे काही आहे, त्याला वैश्विक परिमाण देणं हा माझा राष्ट्रवाद आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi opens up about nationalism in an exclusive interview with Abhijit Pawar