ModiWithSakal : पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनणं ही घराणेशाही : मोदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

चारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत.

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 

प्रश्‍न : मागच्या काही दिवसांत भाजपने अनेक पक्षांतून नेते घेतले. एका बाजूला तुम्ही घराणेशाहीवर टीका करता, काँग्रेसची विचारसरणी तुम्हाला मान्य नाही. दुसरीकडे काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देता, तसेच अनेक घराण्यांचे वारस असलेल्या नेत्यांनाही भाजपमध्ये प्रवेश देता...

उत्तर : घराणेशाहीचा अर्थ समजून घ्यायला हवा. एखाद्या खासदाराचा मुलगा आमदार झाला, तर त्याला मी घराणेशाही मानत नाही. हेही न झाले तर चांगलेच, पण त्याला घराणेशाही म्हणता येत नाही. एखाद्या पक्षात वडिलांनंतर मुलगा नेता बनतो, पुतण्या नेता होतो किंवा त्याचा चुलत भाऊ नेता बनतो आणि पक्षाचं स्वरूप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखं होतं तिथं घराणेशाही असते. देशात अनेक ठिकाणी हे होतं आहे. हरियानात आयएनएलडीमध्ये दोन भावांत भांडण झालं. दोन पक्ष वेगळे झाले. याचा फटका झिंदाबाद म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना भोगायला लागतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३७ मध्ये सांगून ठेवलं आहे, की लोकशाहीचा सर्वांत मोठा शत्रू घराणेशाही आहे. एका घरात पाच आमदार असले, तर त्याला मी घराणेशाही नाही म्हणत, पण पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनणं ही घराणेशाही आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi opens up about nepotism in an exclusive interview with Abhijit Pawar