ModiWithSakal : शरद पवार अत्यंत चाणाक्ष राजकीय निरीक्षक, पण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत.

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 

प्रश्‍न : अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात आणि शरद पवार यांच्या विरोधात आपण खूपच आक्रमक झाल्याचं दिसतं, याचं कारण काय?

उत्तर : मी व्यक्तिशः शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक नाही. शरद पवार अत्यंत चाणाक्ष राजकीय निरीक्षक आहेत, असं मला वाटतं. म्हणूनच जेव्हा ते काँग्रेसच्या अध्यक्षांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतात तेव्हा काही प्रश्न उभे राहतात. त्यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. एखादा राष्ट्रवादी देशात दोन पंतप्रधान असावेत याचं समर्थन करू शकतो का? एखादा राष्ट्रवादी अॅस्पा कमकुवत करून लष्कराला कमजोर करण्याचं समर्थन करू शकतो का? एखादा राष्ट्रवादी देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं समर्थन करू शकतो का? पण कोणी काश्‍मिरी नेता म्हणतो, की देशात दोन पंतप्रधान असायला हवेत आणि ते तुमचे सहकारी असतील तर मग प्रश्‍न पडतो, शरदराव तुम्हीसुद्धा? म्हणून मला त्यांच्याविरुद्ध बोलावं लागतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi opens up about Sharad Pawar in an exclusive interview with Abhijit Pawar