Election Results : माढ्यात राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे पिछाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

यंदा निवडणुकीत सगळ्यात प्रतिष्ठेची म्हणून माढाची जागा चर्चेत आली.

लोकसभा निकाल 2019 : यंदा निवडणुकीत सगळ्यात प्रतिष्ठेची म्हणून माढाची जागा चर्चेत आली. सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणातले दिग्गज विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून अनेकांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली दिसते.

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयमामा शिंदे पिछाडीवर असून, भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडीवर आहेत. नाईक निंबाळकर यांना 392116 मते मिळाली असून, संजयमामा शिंदे यांना 348141 मते मिळाली आहेत. 

या मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद इथे उभी केली होती. पण ते पेलवण्याची ताकद नुकतेच काँग्रेसमधून भाजपमधे आलेले रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यात नव्हती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCPs Sanjay Shinde leading in Madha Loksabha Constituency for Lok Sabha 2019