Loksabha 2019 : लोकसभेसाठी लागणार आठ हजार एसटी बस

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 एप्रिल 2019

लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदानाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सात हजार 787 बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत जाताना आठ हजार 787, तर येताना आठ हजार 723 बस लागणार आहेत.

सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदानाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सात हजार 787 बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत जाताना आठ हजार 787, तर येताना आठ हजार 723 बस लागणार आहेत.

अमरावती 72, अकोला 312, यवतमाळ 249, बुलडाणा 257, भंडारा 243, नागपूर 254, गडचिरोली 204, वर्धा 143, चंद्रपूर 170, मुंबई 299, पालघर 159, रायगड 288, सिंधुदुर्ग 120, ठाणे 216, नगर 409, धुळे 324, जळगाव 434, नाशिक 494, सोलापूर 437, पुणे 573, सांगली 367, सातारा 432, सोलापूर 584, औरंगाबाद 341, बीड 253, जालना 154, लातूर 174, नांदेड 239, उस्मानाबाद 172 आणि परभणीसाठी 208 बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need of eight thousand ST buses for Lok Sabha