Election Results : 'ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधान

गुरुवार, 23 मे 2019

आज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी भारताच्या 130 कोटी नागरिकांसमोर मान झुकवून नमन करतो.

नवी दिल्ली : आज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी भारताच्या 130 कोटी नागरिकांसमोर मान झुकवून नमन करतो. या मतदानाचा आकडा लोकशाहीसह जगातील सर्वांत मोठी घटना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) सांगितले. 'ये नया हिंदुस्थान है', असेही ते म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये भाजप विजयाच्या उंबरठ्यावर आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, देश स्वातंत्र्य झाला अनेक निवडणुका झाल्या. पण सर्वाधिक मतदान या निवडणुकीत झाले. 40-42 तापमान असतानाही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भारताच्या लोकशाहीच्या ताकदीला ओळखायला हवे. या निकालाबद्दल निवडणूक आयोग, सुरक्षा व्यवस्थेतील सर्वांचे तसेच लोकशाहीचा विश्वास वाढविणाऱया सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. 

ही निवडणूक आम्ही लढत नसून, देशातील जनता लढत आहे. आमचा हा विजय संपूर्ण जनतेला समर्पित आहे. खांद्याला खांदा लावून काम केलेल्या प्रत्येकाचा विजय आहे. यामध्ये विजयी झालेल्या सर्व प्रतिनिधींचे मी स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो. 

या निवडणुकीत झालेला हा विजय भारताच्या संविधानाला समर्पित आहे. या विजयाबद्दल तुम्हा सर्वांचे कोटी-कोटी आभार. आम्ही कधी थांबलो नाही कधी थकलो नाही तर कधी झुकलोही नाही. आम्ही दोन होतो पण आता दुसऱ्यांदा आलो तर आम्ही आमचे आदर्श, संस्कार हे सर्व कधीही सोडणार नाही. हा विजय आशा-अपेक्षांचा विजय आहे. हा विजय त्या आजारी व्यक्तीचा विजय आहे. त्याच्या आशीर्वादाचा विजय आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is New India says Narendra Modi After Loksabha Results