esakal | Loksabha 2019 : विधानसभा पराभूतांकडून सुळे यांचा प्रचार
sakal

बोलून बातमी शोधा

baramati_sule

गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्याकडून पराभूत झालेले चार उमेदवार लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेयांच्यासाठी काम करीत आहेत.  

Loksabha 2019 : विधानसभा पराभूतांकडून सुळे यांचा प्रचार

sakal_logo
By
रमेश वत्रे

केडगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्याकडून पराभूत झालेले चार उमेदवार लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेयांच्यासाठी काम करीत आहेत.  

आमदार कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. माजी आमदार रमेश थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस), उद्योजक विकास ताकवणे (शेकाप), पोपट ताकवणे (काँग्रेस), राजाराम तांबे (मनसे) हे गेल्या विधानसभा निवडणुकीत कुल यांच्याकडून पराभूत झाले आहेत. या चौघांनाही राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारी दिली होती. तांबे हे प्रचारात नसले तरी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पांडुरंग मेरगळ यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असून ते सुद्धा आता सुळे यांचा प्रचार करीत आहे.

कुल हे दौंडची अस्मिता व मतदार संघाचा समतोल विकास या मुद्द्यावर मते मागत आहेत. राष्ट्रवादी हे  सरकार व राहुल कुल यांच्यावर टीका करत मते मागत आहे. राष्ट्रवादीकडे, संस्था व  पुढा-यांचा मोठा भरणा आहे तर कुल यांच्याकडे छोटे कार्यकर्ते आहेत. मतदार पुढा-यांच्या मागे जाणार की अस्मितेला जागणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.

loading image