Loksabha 2019 : पटनाईक पिता आणि पुत्र ओडिशात सर्वांत श्रीमंत 

पीटीआय
Saturday, 27 April 2019

ओडिशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनाईक आणि त्यांचा मुलगा नवज्योती हे सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी राज्यात 29 एप्रिलला चौथ्या टप्प्याचे शेवटचे मतदान होईल. 

भुवनेश्‍वर : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनाईक आणि त्यांचा मुलगा नवज्योती हे सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी राज्यात 29 एप्रिलला चौथ्या टप्प्याचे शेवटचे मतदान होईल. 

बालासोर लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरलेल्या नवज्योती यांची एकूण संपत्ती 104 कोटी रुपयांची असून, या मतदारसंघातून रिंगणात असलेल्या 52 उमेदवारांमध्ये ते सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि बीजू जनता दलाचे उमेदवार रवींद्रकुमार जेना हे 72 कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. निरंजन हे विधानसभेसाठी उभे असून, 60 कोटी रुपयांच्या संपत्तीसह 334 उमेदवारांमध्ये ते अव्वल आहेत. घासीपुरा आणि भण्डारीपोखरी या दोन मतदारसंघांमधून ते रिंगणात आहेत.

ओडिशात निवडणुकीच्या या अखेरच्या टप्प्यात लोकसभेच्या मयूरभंज, बालासोर, भद्रक, जाजपूर, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या मतदारसंघांसाठी मतदान होईल. त्याचबरोबर विधानसभेच्या 42 मतदारसंघांतही मतदान होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patnaik father and son are richest in Odisha