Loksabha 2019 : मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ; भरसभेत दाखविले काळे झेंडे

वृत्तसंस्था
रविवार, 14 एप्रिल 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमरावती येथे आज (रविवार) जाहीरसभा झाली. या भरसभेतच धरणग्रस्तांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली.

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमरावती येथे आज (रविवार) जाहीरसभा झाली. या भरसभेतच धरणग्रस्तांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण सुरु होते. हे भाषण सुरु असतानाच संतप्त धरणग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेत काळे झेंडे दाखवले. तसेच त्यांनी यावेळी घोषणाबाजीही केली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे सभेत काही काळ तणाव निर्माण झाला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples did Misbehavior in CM Devendra Fadnavis Public Meeting in Amravati