Loksabha 2019 : वाराणसीतून मोदी निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारी अर्ज दाखल 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 26) आपला लोकसभा निवडणूकीसाठीचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्राचे वाचन केले.

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 26) आपला लोकसभा निवडणूकीसाठीचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्राचे वाचन केले. यावेळी वाराणसीतील जुने कार्यकर्ते सुभाष गुप्ता यांनी प्रास्तावक म्हणून तर अन्नपूर्णा शुक्ला आणि जगदीश चौधरी अनुमोदक म्हणून भूमिका बजावली. 

मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप व एनडीएतील मित्रपक्षातील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. अमित शहा नितीन गडकरी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, उद्धव ठाकरे, नितीश कुमार, प्रकाशसिंग बादल इ ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. यामुळे एनडीएचे वारणसीत जोरदार शक्तीप्रदर्शन झाले आहे. 

मोदींनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काळभैरवाची पूजा केली व दर्शन घेतले व अर्ज दाखल केला. काल (ता. 25) मोदींनी वाराणसीत जंगी रोडशो केला होता, तर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

'देशात सत्तेच्या विरोधात नाही, तर सत्तेच्या बाजूने वातावरण आहे. मोदी देशाची मान कुठेही झुकु देणार नाही, तर तुम्ही भाजपचा झेंडा वाराणसीत झुकु देऊ नका. मी हरेन-जिंकेन, पण बूथ कार्यकर्ता हरला नाही पाहिजे. जनतेच्या आशा-अपेक्षा आमच्यावर आहेत आणि आम्ही त्या पूर्ण करणार.' असे मोदींनी भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना केले.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi filed nomination from Varanasi Loksabha Constituency