Loksabha 2019 : बायको मुलं नसणाऱ्याला कुटुंबाचं मोल समजणार कसं : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींना बायको मुलं नाहीत. त्यामुळे त्यांना कुटुंबाचे मोल कसे समजणार अशी टिका पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींना बायको मुलं नाहीत. त्यामुळे त्यांना कुटुंबाचे मोल कसे समजणार अशी टीका पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. महाराष्ट्रातील अनेक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर बोलताना पवार कुटुंबाला लक्ष केले होते. त्यांच्या टीकेला उत्तर देताना पवारांनी दुसऱ्यांदा मोदींवर हल्ला चढवला.

नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबामध्ये सर्वकाही अलबेल सुरु नसून, अजित पवार राष्ट्रवादीची सुत्र त्यांच्या हातात घेऊ पहात असल्याची टिका केली होती. त्यावर पवार कुटुंबातील अनेकांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.

शरद पवार पुन्हा मोदींवर टीका करताना म्हणाले, 'माझ्या घरात मुलगी, पत्नी, नातेवाईक असे सर्वजण आहेत. आमचं मोदींसारखं नाही. त्यांच्या घरात कोणीच नसल्यानं त्यांना कुटुंब चालवण्याचा अनुभव नाही. त्यामुळेच दुसऱ्यांच्या कुटुंबात नाक खुपसणं बंद करा, असा सल्ला शरद पवारांनी नरेंद्र मोदींना दिला.

या आधी रविवारी (ता. 14) बीडमध्ये झालेल्या सभेत पवारांनी मोदींवर याच कारणावरून टिका केली होती. पवार म्हणाले होते, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाकी आयुष्य जगत आहेत. त्यामुळे कुटुंब कसं चालतं याची जाणीव त्यांना नाही. मोदी आजकाल सतत माझ्या कुटुंबावर टीका करतात. पण त्यांना कुटुंब काय असतं, याची कल्पना नाही. त्यामुळे त्यांनी नको त्या ठिकाणी नाक खुपसणं बंद करावं. अशी जाहीर टिका केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi never understand Importance of Family because he has no wife or children says Sharad Pawar