Loksabha 2019 : प्रचार संपताच केदारनाथडे धाव; मोदींचे 'जय भोलेनाथ' (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
रविवार, 19 मे 2019

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केदारनाथ धामला भेट देत महादेवाचे दर्शन घेतले, तसेच येथे पूजाविधीही केला. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

केदारनाथ (उत्तराखंड) : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केदारनाथ धामला भेट देत महादेवाचे दर्शन घेतले, तसेच येथे पूजाविधीही केला. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील दोन वर्षांतील पंतप्रधान मोदींचा हा चौथा केदारनाथ दौरा आहे. मोदी रविवारी म्हणजे उद्या बद्रिनाथलाही भेट देणार आहेत. 

हिवाळ्याचा ऋतू संपल्यानंतर आता या दोन्ही देवस्थानांची दारे भाविकांसाठी खुली झाली आहेत. निवडणूक आयोगानेही आज पंतप्रधानांच्या या देवदर्शनाला मान्यता देताना पंतप्रधान कार्यालयास आदर्श आचारसंहितेची आठवण करून दिली. दरम्यान, मोदींच्या या देवदर्शनावर विरोधकांनी टीका केली आहे. मोदींनी कितीही देवदर्शन घेतले, तरीसुद्धा भाजपचा पराभव अटळ असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. 

काठीचा आधार 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज प्रथमच काठीचा आधार घेत केदारनाथाचे दार गाठले. या,वेळी त्यांनी रुद्राभिषेक करीत शिवआराधनाही केली. तब्बल अर्धा तास पूजाविधी केल्यानंतर त्यांनी केदारनाथाच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली. यानंतर त्यांनी भक्तांना हात दाखवीत अभिवादनही केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Visits Kedarnath After Finishing Election Campaign