Loksabha 2019 : साध्वींचे वक्तव्य म्हणजे गांधींची आत्मिक हत्या : सत्यार्थी

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मे 2019

- गोडसेकडून महात्मा गांधी यांच्या शरीराची हत्या केली होती

- प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारख्या लोकांनी त्यांच्या आत्माची हत्या केली

नवी दिल्ली : भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. त्यानंतर आता नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या शरीराची हत्या केली होती. मात्र, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारख्या लोकांनी त्यांच्या आत्माची हत्या केली.

नथुराम गोडसेला प्रज्ञासिंह ठाकूर यांनी देशभक्त म्हटले होते. त्यावर सत्यार्थी म्हणाले, नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या शरीराची हत्या केली होती. मात्र, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारख्या लोकांनी त्यांच्या आत्माची हत्या केली. तसेच असे लोक अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताची हत्या करत आहेत. महात्मा गांधी सत्ता आणि राजकारणापेक्षा मोठे आहेत. भाजप नेतृत्त्वाने या छोट्या फायद्याचा मोह न बाळगता संबंधित लोकांना पक्षातून तात्काळ काढायला हवे, असे कैलाश सत्यार्थी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pragya Singh Thakur statement is the spiritual murder of Gandhi says Kailash Satyarthi