Loksabha 2019 : जिवा पांडू गावित यांना प्रहार जनशक्तीचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला.

वणी (नाशिक) : प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पत्र देऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार जिवा पांडू गावित यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांचे पत्र माकप जिल्हा सचिव सुनील मालुसरे यांच्याकडे सुपूर्त केले. याप्रसंगी भाकपचे राजू देसले उपस्थित होते.

प्रहारचे नेते दत्तू भाऊ बोडके, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शरद शिंदे, जिल्हा नाशिक अध्यक्ष अनिल भडांगे, जिल्हाप्रमुख जगन काको, युवा जिल्हाप्रमुख नितीन गवळी, जिल्हा सरचिटणीस प्रकाश चव्हाण, समाधान बागल जिल्हा चिटणीस चंद्रभान गांगुर्डे, अपंग जिल्हा अध्यक्ष नानेश्वर ढोली, औद्योगिक जिल्हा अध्यक्ष श्याम गोसावी, शहरप्रमुख नाशिक हरिभाऊ महाजन, येवला शहराध्यक्ष संध्या जाधव, महिला अध्यक्ष किरण चरलम, समाधान महाले, इगतपुरी सरचिटणीस आदींनी संपूर्ण मतदारसंघात प्रचार करण्याचा निर्णय घेतला. 

शेतकरी एकजूट गावितांना विजयी करण्याचा निर्धार केला. प्रहार नेते गवितांच्या प्रचारार्थ दिंडोरी मतदारसंघात जाहीरसभा ही घेणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prahar Janshakti Paksh Supports Jiva Pandu Gavit