Loksabha 2019 :...म्हणून प्रियांका गांधींनी वाराणसीतून लढण्यास दिला नकार

वृत्तसंस्था
Tuesday, 30 April 2019

- वाराणसीतून काँग्रेसकडून अजय राय यांना देण्यात आली उमेदवारी.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, प्रियांका गांधी यांना उमेदवारी न मिळता अजय राय यांना वाराणसीतून उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारीवरून प्रियांका गांधी यांनी सांगितले, की ''पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसह उत्तर प्रदेशातील माझ्या सहकाऱ्यांचा सल्ला मी घेतला होता. त्यांच्या या सल्ल्यानंतर मी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला''.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या उमेदवारीनंतर प्रियांका गांधी याच मतदारसंघातून निवडणूक लढवतील आणि मोदी-गांधी यांच्यात खरा राजकीय सामना रंगेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, प्रियांका गांधी यांनी निवडणूक न लढविण्यास नकार दिला. 

याबाबत प्रियांका गांधी यांनी सांगितले, की ''पक्षातील ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशातील सहकारी या सर्वांचा सल्ला मी घेतला. तेव्हा त्यांनी माझ्यावर येथील 41 जागांची जबाबदारी असल्याचे सांगितले. तसेच जर मी फक्त एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित केले तर येथील उमेदवार नाराज होतील, असे मला वाटले. त्यामुळे मी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला''.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Gandhi Vadra gave reason of not filled nomination from Varanasi Constituency