Loksabha 2019 : राज ठाकरेंची तोफ नाशिकमध्येही धडाडणार

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा 26 एप्रिलला गोल्फ क्‍लब मैदानावर होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी बुधवारी मनसेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली.

नाशिक : एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा 26 एप्रिलला गोल्फ क्‍लब मैदानावर होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी बुधवारी मनसेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी येत्या 29 रोजी मतदान होत असल्याने शेवटच्या आठवड्यात सर्वच पक्षांकडून सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा 22 रोजी व त्यानंतर 24 किंवा 25 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा गोल्फ क्‍लब मैदानावर होईल.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह पक्षनेत्यांची मोठी फौज नाशिक व दिंडोरीच्या मैदानात प्रचारासाठी उतरणार आहे. परंतु, नाशिककरांना राज ठाकरे यांच्या सभेबद्दल सर्वाधिक उत्सुकता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public Rally of Raj Thackeray will be hold in Nashik Also