Loksabha 2019 : राधाकृष्ण विखे-पाटील आता शिवसेनेच्या व्यासपीठावर

Friday, 26 April 2019

- शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत विखे-पाटलांची उपस्थिती.

मुंबई : काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंजूर केला. त्यांच्या या राजीनाम्यानंतर विखे-पाटील यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली.

राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानंतर भाजपकडून डॉ. सुजय यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीरसभेत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. यावरून काँग्रेस नेत्यांकडून टीका केली जात होती. त्यानंतर कालच (गुरुवार) विखे-पाटील यांचा राजीनामा राहुल गांधी यांनी मंजूर केला. त्यानंतर आता राधाकृष्ण विखे-पाटील शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थिती लावली.

दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीमुळे ते आता शिवसेनेत प्रवेश करणार की भाजपमध्ये का काँग्रेसमध्येच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhakrishna Vikhe Patil is now on Shivsena Stage