Loksabha 2019 : कमलछाप चौकीदार ही चोर है : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 April 2019

जनतेच्या न्यायालयात 'कमलछाप चौकीदार ही चोर है' याचाही निकाल लागणार आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे या दिवशी लागणार आहे. त्याच दिवशी जनतेच्या न्यायालयात 'कमलछाप चौकीदार ही चोर है' याचाही निकाल लागणार आहे. अशा आशयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपरोधात्मक टिका करणारे ट्विट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

आता 'न्याय' होणार आहे. गरीबांना लुटून श्रीमंत मित्रांच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या चौकीदाराला शिक्षा मिळणार असल्याचेही राहुल गांधी यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान उद्या होणार आहे. अशात संपुर्ण देशभर निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना देशातील प्रमुख नेते मिळेल त्या मार्गाने विरोधकांवर टिका करण्याची संधी सोडत नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi comments on Narendra Modi on twitter