RahulWithSakal : शेतीतून रोजगारनिर्मिती होऊ शकते : राहुल गांधी

Rahul Gandhi and Abhijit Pawar
Rahul Gandhi and Abhijit Pawar

प्रश्‍न : रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्‍न यांसारख्या मुद्द्यांचे काय?
उत्तर : हे पाहा. सध्या भारताला तीन प्रमुख समस्या भेडसावत आहेत. रोजगाराचे संकट, शेतीतील संकट आणि अर्थव्यवस्थेपुढील संकट. हे तीनही प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले आहेत. आपल्या व्यवस्थेकडे समग्र दृष्टीने पाहिले पाहिजे. स्टार्टअपसाठी धोरण आखले आणि त्यात शेतीचा समावेश केलाच नाही, तर ते अयोग्य होईल. तुम्ही रोजगार निर्माण कसे करणार? तो शेतीतूनच निर्माण होईल. बांधकाम क्षेत्रातून तयार होईल. त्यामुळेच या सगळ्यांचा समग्र विचार आवश्‍यक आहे. मोदी हे लक्षात घेत नाहीत आणि हीच त्यांची समस्या आहे.  

ते तुकड्या-तुकड्याने या सगळ्यांचा विचार करतात. ते आधी एका गोष्टीवर भर देतात, मग दुसरी गोष्ट विचारात घेतात, त्यानंतर तिसऱ्या गोष्टीकडे वळतात. ही पद्धतच फार चुकीची आहे. नोटाबंदी हे याचे उदाहरण.

काश्‍मीरविषयक धोरण आणि जीएसटी हेदेखील याच शैलीचे उदाहरण. भारतीय अर्थव्यवस्था नावाच्या ‘जिगसॉ पझल’मधील सगळे तुकडे नीट जुळण्याच्या दृष्टीने धोरणात्मक व्यूह ठरवणे आवश्‍यक आहे. आम्ही काय साध्य करू इच्छितो आणि किती वेळात, याचा नीट विचार केला तर रोजगाराचा प्रश्‍न सुटू शकतो. शेतीची समस्याही सुटू शकते. आपल्या धोरणांचा परिणाम ज्यांच्यावर होणार आहे, त्या समाजातील व्यक्तींशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय यशस्वी धोरणे आखता येत नाहीत. भारतीय समाजाच्या अंगभूत जाणतेपणाबद्दल काँग्रेस पक्षाला विश्‍वास आहे. आम्ही लोकांसाठी काम करतो, लोकांचे ऐकतो, त्यांच्याकडून शिकतो. मोदी, भाजप आणि काँग्रेस पक्ष यात हाच मूलभूत फरक आहे.

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. काँग्रेसची धोरणे, पुढची वाटचाल याविषयी बोलताना काँग्रेसच गरिबांना ‘न्याय’ देईल, यावर गांधी यांनी भर दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com