RahulWithSakal : आम्ही मोदींचा मुखवटा दूर केला : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. 

प्रश्‍न : ‘आप’ने काहीतरी योग्य करून दाखवले आहे, आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे, लोकांमध्ये जाऊन, त्यांना जाणून घेतले पाहिजे, असे तुम्ही २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर म्हणाल्याचे मला आठवते आहे. २०१४ नंतर राहुल गांधी म्हणून तुम्ही काय शिकलात? काही तज्ज्ञांची मते जाणून घेण्यापेक्षा थेट लोकांमध्ये जाऊन त्यांचे मत जाणून घ्यावे, हेच तुम्ही कार्यकर्त्यांना सांगत आहात काय?

उत्तर : शिकणं म्हणाल तर, २०१४ ही चांगली बाब आहे. माझ्या दृष्टीने ती अतिशय प्रभावी घटना होती. अनेक गोष्टींबाबत या घटनेने मला विचार करायला भाग पाडले. लोकांमध्ये जाण्यास भाग पाडले. तुम्हाला आठवत असेल तर, नरेंद्र मोदी खूप मताधिक्‍याने सत्तेवर आले. प्रत्येक जण असंच सांगत होता, की नरेंद्र मोदी दीर्घकाळ पंतप्रधान पदावर राहतील; पण आम्ही मोदींचा मुखवटा दूर केला. सत्य बाहेर आणले. जे नरेंद्र मोदी २०१४ मध्ये सत्तेवर आले होते ते आता तसे राहिलेले नाहीत. दोन कोटी रोजगार? अपयश. शेती? अपयश. भ्रष्टाचारमुक्ती? अपयश. त्यांचे सर्व प्रकारचे मुखवटे आम्ही दूर केलेत, ते आज तुम्ही त्यांच्या चेहेऱ्यावरूनही अनुभवत असाल. सध्याच्या निवडणुकीत, त्यांच्याकडे सांगण्यासारखं खरंच काहीही नाहीये. भारताच्या या पंतप्रधानांनी व्यासपीठावर उभं राहून सांगावं, की त्यांनी किती रोजगारांची निर्मिती केली. व्यासपीठावरून त्यांनी सांगावं शेतकऱ्यांसाठी काय केलं ते? ते काहीही सांगतच नाहीत. त्यांच्या जाहीरनाम्याकडे पाहा, उभ्या देशाला भेडसावणाऱ्या रोजगाराच्या प्रश्‍नावर त्यात मौन बाळगलं आहे. पंतप्रधान मौन बाळगून आहेत. नोटाबंदी का केली, याचेही स्पष्टीकरण ते जनतेला देत नाहीत. जीएसटी ही एक आपत्ती ठरली आहे, त्याबाबत काही समस्या आहेत, त्या दूर केल्या पाहिजेत, हेही पंतप्रधान जनतेला सांगत नाहीत.

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. काँग्रेसची धोरणे, पुढची वाटचाल याविषयी बोलताना काँग्रेसच गरिबांना ‘न्याय’ देईल, यावर गांधी यांनी भर दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi opens up about loksabha 2019 in an exclusive interview with Abhijit Pawar