RahulWithSakal : घराणेशाहीवर नाही, तर गुणवत्तेवर माझे मूल्यमापन करा : राहुल गांधी

Rahul Gandhi Abhijit Pawar
Rahul Gandhi Abhijit Pawar

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. काँग्रेसची धोरणे, पुढची वाटचाल याविषयी बोलताना काँग्रेसच गरिबांना ‘न्याय’ देईल, यावर गांधी यांनी भर दिला.

प्रश्‍न - मोदी घराणेशाहीवर बोलतात... तुम्हांला जर काँग्रेसमधील घराणेशाही, गुणवत्ताशाहीबाबत विचारलं, तर तुम्ही काय सांगाल?

उत्तर - प्रथमतः मी लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी आहे. मी लोकसभेच्या तीन निवडणुका जिंकलोय. लोकांचे प्रतिनिधित्व करायला मी योग्य आहे की नाही, हे लोकच ठरवतील ना! नंतर मला माझ्या गुणवत्तेवर तपासा. मी जी राजकीय लढाई लढतोय, त्यावर माझे मूल्यमापन करा. कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता मी पाच वर्षे मोदींशी लढतोय! काँग्रेसने मुखवट्यामागचे मोदी दाखवून दिले आहेत. अखंड भारतभर एकच स्लोगन गाजते आहे - चौकीदार चोर है! रस्तोरस्तो हीच स्लोगन आहे. ते त्यांना आवडत नाही, पण तेच खरे आहे. म्हणून माझे गुणवत्तेवर मूल्यमापन करा. मी कसा लढा देतोय त्यावर माझे मूल्यमापन करा. मी भूमिका काय घेतो, त्यावर मूल्यमापन करा. शेतकरी, युवक, महिला, छोटे व्यावसायिक यांच्यासाठी काय करतो, त्यावर माझे मूल्यमापन करा. मी त्यांच्यासाठी काय केले ते पाहा. या सर्व बाबींवर माझे मूल्यमापन करा.

नेत्यांची मुले म्हणून काँग्रेस पक्षात काही प्रमाणात वारसा आहे. पण हे केवळ काँग्रेसमध्येच आहे, असे नव्हे. सर्वच राजकीय पक्षांत हे आहे. तथापि, या तरुणवर्गात मोठमोठ्या क्षमता आहेत. ते सक्षम आहेत. त्यामुळेच राजकारण्यांच्या या वारसदारांवर आपण पूर्णतः बंदी नाही आणू शकत. सर्व बुद्धिमान व्यक्तींसाठी आमचे दरवाजे खुले आहेत आणि येथे आल्यानंतर क्षमतेनुसार त्यांच्या वाढीला वाव आहे, याची मात्र आम्ही खात्री दिली पाहिजे.

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com