Loksabha 2019 : राहुल गांधी दोन्ही ठिकाणी पराभूत होणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

पुणे : ''पराभवाच्या भीतीने राहुल गांधी अमेठी बरोबर वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणांवरून त्यांचा पराभव होणार आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली.

पुणे : ''पराभवाच्या भीतीने राहुल गांधी अमेठी बरोबर वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणांवरून त्यांचा पराभव होणार आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली.
 
पुण्यात प्रचारासाठी आले असता त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पुढच्या निवडणूकीत राहुल गांधींना शेजारील देशातील मतदारसंघात जावे लागेल असा टोला मारत पियुष गोयल म्हणाले, 'चौकीदार चोर है' यावरून सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना आधीच नोटीस बजावली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. 

''उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला असला तरी देशातील १३० कोटी जनता भाजप बरोबर आहे.'' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi will be defeated in both places