Loksabha 2019 : 'निवडणूक लढविण्यास राहुल यांना अपात्र ठरवा'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मे 2019

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावर निर्णय होईपर्यंत त्यांना लोकसभा निवडणूक लढण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावर निर्णय होईपर्यंत त्यांना लोकसभा निवडणूक लढण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.

राहुल यांच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना नोटीस बजावत 15 दिवसांत नागरिकत्वाबाबत माहिती देण्यास नुकतेच सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर जय भगवान आणि सी. पी. त्यागी यांनी याचिका दाखल करत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावरही टीका केली आहे. राहुल यांनी स्वत:हून ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले असल्याच्या आरोपाबाबत केंद्र आणि आयोगाने काहीही कारवाई केली नसल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. तसेच, गृह मंत्रालय आणि आयोगासमोर सादर झालेल्या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे राहुल यांना ही लोकसभा निवडणूक लढण्यास अपात्र ठरवावे, असे याचिकेत म्हटले आहे.

तसेच, राहुल यांच्या नागरिकत्वाचा निर्णय होईपर्यंत त्यांचे नाव मतदार यादीतूनही वगळण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही याचिका दाखल झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul should be disqualified for contesting elections Petition Filled